प्रधानमंत्री श्री नरेंदर मोदी जी को एक सफाई कामगार की गुहार
प्रधानमंत्री श्री नरेंदर मोदी जी को एक सफाई कामगार की गुहार
प्रति
मा.
प्रधानमंत्री,
सर्व
प्रथम मी आपलेप्रधानमंत्रीपदी
निवडून आल्याबद्दल अभिनंदन
करतो. आपणही
एक सर्वसामान्य
कुटुंबातून
येतात, त्यामुळेआपण
पंतप्रधान झाल्यावर न्याय
मिळण्याची एक नवीन उमेद आम्हाला
मिळाली
आहे.
माझेनाव
दादाराव बाबुराव पाटेकर आहे.
मी मुंबईत
चेंबूर भागातल्या एका झोपडपट्टीत
राहतो. मी
१९९७ पासून
बृहन्मुंबई
महानगर पालिकेत (जी
देशातील सर्वात श्रीमंत महानगर
पालिका आहे) सफाई
कामगार म्हणून काम
करत
आहे. मी
एक दलित असून माझेपूर्वजही
अशाच प्रकारची कामेकरत.
प्रती दिनी
मात्र रु४० रोजानेमी ह्या
कामाला
सुरुवात केली. आता
सुमारे१७ वर्षानंतरही माझा
पगार मात्र रु३२९ आहे.
आम्हाला
कामावर कोणत्याही
प्रकारची
सुरक्षा उपकरणेउपलब्ध करून
देण्यात येत नाहीत.
त्याचबरोबर
भविष्य निर्वाह निधी तसेच
आरोग्य
सोयी
पासूनही आम्हाला वंचित ठेवण्यात
येते. आमचेकाम
कचऱ्याशी निगडीत असल्यानेआम्हाला
नेहमीच
वेगवेगळ्या
आजारांचा सामना करावा लागतो.
परंतुमहानगर
पालिकेकडून ह्या संदर्भात
कोणत्याही प्रकारची
आर्थिक
सहाय्यता करण्यात येत नाही.
आजारपणातही
कामावर रजा मिळत नाही.
माझी मुलगी
पहिल्या वर्गात
शिकत
आहे. मी
तिला खूप शिकवूइच्छितो.
परंतुमाझ्या
पगारात मला घरखर्च भागवनही
कठिण जात. त्यामुळे
माझ्या
मुलीचेभवितव्य धोक्यात आहे.
साफ सफाईचेकाम
हेअत्यावश्यक व रोज चालणारेकाम
आहे. त्यानुसार
ह्या
कामावर कंत्राटी पद्धतीनेकामगार
नेमनेगैरकानुनी आहे.
तरीही महानगर
पालिका सर्व कायद्यांना
धाब्यावर
बसवून हजारो कामगारांचेशोषण
करत आहे.
माझ्या
इतर सहकार्यांचेहेच किंवा
ह्याहून अधिक वाईट हाल आहेत.
मुंबई महानगर
पालिकेत आजही कामगार
किमान
वेतानाहून कमी पगारावर काम
करत आहेत. तरी
कंत्राटी पद्धतीनेसफाई काम
बंद करण्याची मी
आपणास
नम्र विनंती करतो.
त्यामुळेदलितांवर
पूर्वापार होणाऱ्या अन्यायास
रोक बसेल आणि त्यांनाही
समाजातील
इतरांशी खांद्याला खांदा
लावून विकास करण्याची संधी
मिळेल.
न्यायाच्या
प्रतीक्षेत देशाचा एक मूक
सेवक!
न्याय
की उम्मीद रखतेहुए देश का एक
मूक सेवक
आपला
नम्र,
दादराव
बाबुराव पाटेकर
Comments
Post a Comment